esakal | अँटीजेन किट संपल्याने कोरोना चाचण्या थांबल्या

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या ोचाचण्या
अँटीजेन किट संपल्याने कोरोना चाचण्या थांबल्या
sakal_logo
By
दत्ता उकिरडे

राशीन : कर्जत तालुक्‍यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपिड अँटिजेन किट रविवारी (ता. 25) संपल्या असून, त्यामुळे चाचण्या बंद आहेत. तपासणीसाठी येणाऱ्यांची गैरसोय होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही वाढला आहे.

कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तेथे रोज सुमारे अडीचशे रुग्णांची तपासणी केली जात आहे. राशीनपासून कर्जत सोळा किलोमीटरवर आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात येते. मात्र, रविवारी रॅपिड अँटिजेन तपासणी किट संपल्याने, कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचण्यांसाठी कर्जतला जावे लागत आहे.

अँटिजेन किट संपल्यामुळे राशीनसह परिसरातील अनेकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लवकरात लवकर किट उपलब्ध करून द्यावीत.

- नीलम साळवे, सरपंच, राशीन

किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याकडे मागणी केली आहे. किट लवकरच प्राप्त होतील.

- डॉ. संदीप पुंड, तालुका वैद्यकीय अधिकारी