esakal | बातमी काळजी वाढवणारी ः कोरोनाने नगरमध्ये घेतले दोनशे बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona took two hundred casualties in Ahmednagar

मार्च महिन्यात पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला होता. आता हा आकडा बारा हजारांच्या वर गेला आहे. ही राज्यकर्ते आणि प्रशासनाची काळजी वाढवणारी बाब आहे.

बातमी काळजी वाढवणारी ः कोरोनाने नगरमध्ये घेतले दोनशे बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर: िजल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज किमान पाचशे जणांना बाधा होत आहे. मार्च महिन्यात पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला होता. आता हा आकडा बारा हजारांच्या वर गेला आहे. ही राज्यकर्ते आणि प्रशासनाची काळजी वाढवणारी बाब आहे.

जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.८७ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २५९२ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५२, राहाता ०१, पाथर्डी ०१,  नगर ग्रामीण ०६, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा ०१, पारनेर ०२, अकोले ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा - नगरवर शोककळा...राष्ट्रवादीचे गाडळकर, सोमनाथ धूत काळाच्या पडद्याआड

दरम्यान, आज ४५६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा २२४, संगमनेर २०, राहाता १३, पाथर्डी १४, नगर ग्रा.२३, श्रीरामपूर ०९, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २८, श्रीगोंदा २०, पारनेर ०२, अकोले १४, राहुरी १०, शेवगाव २५, कोपरगाव ०८, जामखेड १०, कर्जत २५, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेले एकूण रुग्ण:१२६०९, उपचार सुरू असलेले रूग्ण: २५९२, मृत्यू: २००, एकूण रूग्ण संख्या:१५४०१

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top