नगरवर शोककळा; राष्ट्रवादीचे गाडळकर, सोमनाथ धूतही काळाच्या पडद्याआड

अमित आवारी
Friday, 21 August 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपजिल्हाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर (वय 36) यांचे आज सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपजिल्हाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर (वय 36) यांचे आज सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.

दरम्यान नगरमधील ज्येष्ठ नेते सोमनाथ धूत यांचेही आज निधन झाले आहे. त्यामुळे नगर शहरावर शोककळा पसरली आहे. दोनच दिवसांपूर्वी कोहीनूरचे संचालक प्रदीप गांधी हेही काळाच्या पडद्याड गेले आहेत.

गाडळकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मागे आई- वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते निकटवर्तीय कार्यकर्ते होते. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यादीत त्यांचे नाव होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP City Deputy District President Babasaheb Gadkar passed away