संगमनेरात कोरोनामुळे हादरा ः तीन महिलांचा मृत्यू, पुन्हा पाचजण बाधित

Corona tremors in Sangamner Three women die
Corona tremors in Sangamner Three women die

संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊनमध्ये दिलेल्या थोड्या शिथिलतेचा गैरफायदा घेऊन, मनसोक्त घराबाहेर पडलेल्या संगमनेरकरांच्या बेपर्वाईचा परिणाम आज पुन्हा एकदा दिसून आला. संगमनेर शहरातील चार तर तालुक्यातील शेडगाव येथील एक युवक कोरोना बाधित झाल्याचे आढळले आले. कंटेनमेंट झोनमधील उपचार घेत असलेल्या तीन ज्येष्ठ महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कोरोनाचे संक्रमण होवून मृत्यू पावलेल्या दोन्ही महिला गेल्या 6 जून रोजी बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. या दोघींच्या मृत्युमुळे संगमनेर तालुक्यातील कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या तब्बल सातवर पोचली आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 जून रोजी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या मोमीनपुरा येथील 65 वर्षीय व नायकवाडपुरा येथील 63 वर्षीय महिलेचे तसेच शेडगाव येथील 63 वर्षीय महिलेचे नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे.

ही धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरातील बाधिताच्या संपर्कात आल्याने एका 23 वर्षीय महिलेला, नायकवाडपुरा भागातील बाधिताच्या संपर्कात आल्याने 35 वर्षीय तरुणाला तर मदिनानगरमधून नव्याने एक 52 वर्षीय व मोमीनपुरा येथील 30 वर्षीय युवकाला कोरोनाने ग्रासल्याचा अहवाल प्राप्त झाला.

कोरोना संक्रमीत होवून आज तीन महिलांचा बळी गेल्याने संगमनेर तालुक्यात कोरोनाच्या बळींची संख्या आठवर जावून पोचली आहे. आज 5 नवे रुग्ण आढळल्याने संगमनेरच्या कोरोना बाधितांची संख्या 67 झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com