आदिवासी पाड्यातही शिरला कोरोना ः लिंगदेवमध्ये एका शिक्षकाला झाली लागण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

अकोले प्रशासनाची आता एकच धांदल उडाली आहे. या महिलेची तपासणी संगमनेरच्या एका खाजगी रुग्णालयात केली होती. आज ती खाजगी तपासणीनंतर पॉझिटीव्ह आली. तिला लिंगदेव गावातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

अकोले ः आतापर्यंत कोरोनापासून दूर असलेल्या अकोले तालुक्यातही कोरोना प्रादूर्भाव झाला आहे. आदिवासी पाड्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने लोकांनी धास्ती घेतली आहे. विशेष म्हणजे या तालुक्यातही कोरोनाचे मुंबई कनेक्शन आहे. संबंधित बाधित पुरूष मुंबई येथून अाला आहे. त्याला संगमनेर येथील खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आले असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी तातडीने लिंगदेव येथे रवाना झाले आहे. सरपंच रामकृष्ण कानवडे व कमिटीने गाव बंद ठेवले आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी माहिती घेतली असता त्यांनीही माहितीला दुजोरा दिला.

अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे एक पुरूष कोरोना बाधित रूग्ण आढळल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यामुळे, गेल्या दोन महिन्यांपासून अथक परिश्रम घेणाऱ्या प्रशासनाच्या प्रयत्नांना कलंक लागल्यासारखे झाले आहे. दरम्यान या व्यक्तीला कोरोनाची बाधा कशी झाली याची माहिती अद्याप मिळाली नाही. त्यामुळे, अकोले आरोग्य विभाग मोठ्या शर्थीने प्रयत्न करीत आहे. आज (ता. 23) रोजी आरोग्य विभागाकडून हा अहवाल प्राप्त झाली अाहे. 

हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष-उपाध्यक्षांना जुगारवाल्यांचा पुळका

अकोले प्रशासनाची आता एकच धांदल उडाली आहे. या पुरूषाची तपासणी संगमनेरच्या एका खाजगी रुग्णालयात केली होती. आज तो खाजगी तपासणीनंतर पॉझिटीव्ह आला. त्याला लिंगदेव गावातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. अकोले तालुक्यात एकही रुग्ण मिळून आला नव्हता. आता मात्र, तेथे एक जण कोरोना बाधित निघाल्याचे एका खाजगी तपासणीत समोर आले आहे. आरोग्य व महसुल प्रशासनाने लिंगदेवकडे घाव घेतली आहे.

तत्काळ पुढील उपायोजना राबविण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. या बाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता
त्यांनी या माहितीचा दुजोरा दिला आहे. या महिलेची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात येणार आहे. तो अहवाल
आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे. सद्या या महिलेस क्वारंटाईन करण्यात आले आहे. जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच ही महिला पुर्वीपासूनच क्वरंटाईन होती. त्यामुळे, कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नाही, असे तालुका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

बाधित पुरूष शिक्षक

बाधित आढळलेला पुरूष हा शिक्षक आहे. तो मुंबईहून आल्यानंतर त्याला गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यासोबत इतर सहाजण होते. क्वारंटाईनचे दिवस संपल्यानंतर तो घरी गेला. त्याच्या घरात तब्बल ३५ माणसं आहेत. त्यामुळे ते सहाजण आणि कुटुंबातील इतर लोकांनाही क्वारंटाइन केले जाण्याची शक्यता आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona in tribal areas