जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष-उपाध्यक्षांना जुगारवाल्यांचा पुळका...पोलिसांना शिवीगाळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

जुगाराचा छापाप्रकरणी त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांना फोनवरून अरेरावी करीत दमदाटी केली. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना उद्देशून  शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

श्रीगोंदे : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगाराचा छापाप्रकरणी त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांना फोनवरून अरेरावी करीत दमदाटी केली. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना उद्देशून  शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

पितळे यांच्या फिर्यादीवरून मध्यरात्री हा गुन्हा दाखल झाला. दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा पोलिसांनी शहरात जुगार खेळणाऱ्या ठिकाणावर रेड करीत काही लोकांना अटक केली. त्यानंतर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार व भोस यांनी फोनवरून पितळे यांच्याकडे छाप्याबद्दल विचारणा करणारा फोन केला.

हेही वाचा - राशीनमध्ये आजीकडून नातीला बाधा

यात भोस यांनी पितळे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करताना दमदाटी केली. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनाही अपशब्द वापरल्याचे आरोप करीत पितळे यांच्या फिर्यादीवरून हा अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या संभाषणाची मोबाईल रेकॉर्डिंग क्लिप केलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Zilla Parishad president vice president insults police