esakal | नगर जिल्ह्यात कोरोनाच्या १० रुग्णांचा मृत्यृ; नवीन ७८४ बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

नगर जिल्ह्यात कोरोनाच्या १० रुग्णांचा मृत्यृ; नवीन ७८४ बाधित

sakal_logo
By
टीम-ईसकाळ


नगर : जिल्ह्यात दिवसभरात ७८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक २१६ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन लाख २० हजार १२९ झाली आहे. दिवसभरात कोरोना उपचार सुरू असलेल्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सहा हजार ५०५ झाली आहे.


जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ४३, खासगी प्रयोगशाळेत २९७ तर रॅपिड अँटीजेन चाचणीत ४४४ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात सध्या चार हजार ७२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनातून बरे झालेल्या ६४० रुग्णांना डिर्स्चाज देण्यात आला. आतापर्यंत तीन लाख आठ हजार ९०४ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४९ टक्के झाले आहे.
तालुकानिहाय नवीन रुग्ण याप्रमाणेः संगमनेर २१६, अकोले ६४, पारनेर ६४, नगर तालुका ६३, श्रीगोंदे ५२, राहाता ४६, राहुरी ४५, कर्जत ४४, नेवासे ४२, शेवगाव ४१, पाथर्डी ३६, नगर शहर २३, जामखेड १४, कोपरगाव १३, श्रीरामपूर १२, तसेच भिंगार एक आणि बाहेरील जिल्ह्यातील आठ रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा: श्रीगोंदे : कुकडीच्या पाण्याचे हाल, शेतकरी बेहाल

हेही वाचा: नारायण राणे हे मोठे नेते; रोहित पवारांची सावध प्रतिक्रिया

loading image
go to top