श्रीगोंदे : कुकडीच्या पाण्याचे हाल, शेतकरी बेहाल

kukadi
kukadiesakal

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : कुकडी प्रकल्प ओव्हर-फ्लो झाल्यानंतर ते पाणी डाव्या कालव्यातून शेतीला सोडले. त्यावेळी ते ओव्हर-फ्लोचे आवर्तन सांगण्यात आले. काही दिवसांत पाणलोटातील पाऊस थांबल्याने जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी घाईने खरिपाचे आवर्तन घोषित करीत तशी नोटीस काढली. विशेष म्हणजे पाणीमागणीही झाली आहे. करमाळा, कर्जत तालुक्यांतील सिंचन झाले, श्रीगोंद्यात पाणी आले आणि बंद झाले. या सगळ्या नुकसान व गोंधळाची नेमकी जबाबदारी कुणाची, हे निश्चित होणार का, हा प्रश्न आहे.

श्रीगोंद्याच्या हद्दीतील सिंचन सुरू झाल्यावर पाणी संपले. आवर्तन सुरू असताना जलसंपदा विभागाने खरिपाचे आवर्तन असल्याची नोटीस काढत शेतकऱ्यांना पाणी मिळणार, हे दाखवले. त्यानंतर शेतकऱ्यांनी मागणीही दिली. त्यामुळे हमखास पाणी पिकांना मिळणार, हे गृहीत धरुन शेतकऱ्यांनी उसासोबतच इतर पिके वाढवली. पावसाने रुसवा धरला, तरी कुकडीचे पाणी मिळणारच, या भरवशावर असणाऱ्या श्रीगोंदेकरांच्या पदरी निराशा आली.

हक्काचे पाणी मिळाले नाही, याला सर्वस्वी जबाबदार जलसंपदा विभाग व त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत. अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ हे श्रीगोंदेकर आहेत. त्यांचे तालुक्यावर नेहमीच लक्ष असते. यावेळी मात्र त्यांचे नियोजन फसले. कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अगोदरच कल्पना दिली होती. मात्र तेही बेफिकिरीने वागले. त्याचा फटका आता श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.

आज धरणांमध्ये पाणी नाही, असे अजिबात नाही. प्रकल्पात ६२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. डाव्या कालव्यातून ज्या येडगाव धरणातून पाणी तेथील पाणीसाठा कमी आहे. मूळात येडगाव हा डाव्या कालव्यासाठी फिडिंग तलाव आहे. इतर धरणातील पाणी त्यात सोडून आवर्तन केले जाते. मग आज पावसाळा असूनही इतर धरणांतील पाणी आणण्यासाठी धुमाळ यांनी पुढाकार घेणे आवश्यक होते. विशेष म्हणजे ते कालवा सल्लागार समितीचे सचिव असून, आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये त्यांचे चांगले वजन आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी प्रयत्न केले तर उपयोग होऊ शकतो.

kukadi
अमित ठाकरेंचा उद्यापासून नाशिक दौरा; पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी खलबतं

डिंभे ९० टक्के असूनही श्रीगोंदेकर उपाशी

डिंभे धरणात अकरा टीएमसी उपयुक्त पाणी आहे. येथून येडगाव धरणात फिडिंग केले जाते. मात्र, त्यासाठी जो कालवा आहे, तो जुन्या काळातील असल्याने, येडगावसाठी सोडलेले पाणी मोठ्या प्रमाणात जिरते. या कालव्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असले, तरी त्यावर घोषणांशिवाय काहीच होत नसल्याने डाव्या कालव्याखालील शेतकरी कायम संघर्षात राहतात.

कुकडी प्रकल्प धरणांतील उपयुक्त पाणी सद्यःस्थिती (आकडे दशलक्ष घनफूट)

डिंभे- ११ हजार २५२ (९० टक्के), वडज ७८० (६६ टक्के), पिंपळगाव जोगे १२४० (३१ टक्के), माणिकडोह ४६७३ (४६ टक्के), येडगाव ५२८ (२७ टक्के). एकूण - १८ हजार ५०० (६२ टक्के).

kukadi
नारायण राणे हे मोठे नेते; रोहित पवारांची सावध प्रतिक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com