अहमदनगर जिल्ह्यात साडे एकतीस लाख जणांचे लसीकरण | Corona Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

अहमदनगर जिल्ह्यात साडे एकतीस लाख जणांचे लसीकरण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने आता वेग घेतला आहे. जिल्ह्यातील सर्वच नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी आता आरोग्य विभागाने गावा-गावात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आजअखेर ३१ लाख ५० हजार ३०४ जणांचे लसीकरण झाले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून राबविल्या जात आहे. या योजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून अनेकदा कारवाई केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही अंशी यश आले आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेने वेग घेतला आहे. आजअखेर सुमारे ५६६ लसीकरण केंद्रावर ३१ लाख ५० हजार ३०४ जणांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये २३ लाख ३४ हजार ९५५ जण तर आठ लाख १५ हजार ३४९ जणांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण झाले. लसीकरणाची पहिल्या डोसची टक्केवारी ६४.८० तर दुसऱ्या डोसची २२.६३ टक्के आहे.

आरोग्य विभागातील कर्मचारी : ८५४६८
फ्रंटलाईन वर्क : १११३००
१८ ते ४५ वयोगट : १४२३८५२
४५ ते ६० वयोगट : ८२११४८
६० वर्षापुढील : ७०८५३६
एकूण : ३१५०३०४

हेही वाचा: सावधान! अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढतोय

हेही वाचा: "भगवा राजकारणासाठी नाही" - रोहित पवार

loading image
go to top