Ahmednagar | "भगवा राजकारणासाठी नाही" - रोहित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar

"भगवा राजकारणासाठी नाही" - रोहित पवार

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (जि. अहमदनगर) : "भगवा ध्वज माझा एकट्याचा ना तुमचा एकट्याचा आहे, ना राजकीय पक्षाचा, ना कोणत्या विशिष्ट विचाराचा. हा भगवा स्वराज्य ध्वज सगळ्यांचा आहे. मी रंगाचे राजकारण करणार नाही. भगव्या रंगाचे राजकारण महाराष्ट्रात करू देणार नाही. माझे राजकारण विकासाचे आहे," असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. विजयादशमीच्या मुहूर्तावर खर्डा (ता. जामखेड) येथील शिवपट्टण किल्ल्याच्या प्रांगणात जगातील सर्वात उंच चौऱ्याहत्तर मीटरचा उंचीचा भगवा ध्वज उभारण्यात आला. यावेळी आमदार पवार बोलत होते.

या अनोख्या समारंभास विविध मतदारसंघातील आजी-माजी आमदार, वेगवेगळ्या संस्थानचे मठाधिपती, साधु-संत वारकरी, कृषी तज्ज्ञ राजेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पवार आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमास सर्वसामान्यांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरूवात अवधूत गांधींच्या "भगवा गीत" गायनाने झाली. कल्याण येथील नामांकित ढोल पथक वादकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करणारे गीत सादर केले. संपूर्ण परिसर दणाणून गेला. स्वराज्य ध्वज उभारणी स्तंभासमोर ज्योत प्रज्ज्वलीत करण्यात आली. हुतात्मा सैनिक माता अनुराधा गोरे यांच्या हस्ते पूजन झाले. तदनंतर 'मी खर्डा किल्ला बोलतोय' ही ध्वनिफीत सादर करण्यात आली. स्वराज्य ध्वजाच्या यात्रेदरम्यान पूजन झालेल्या शहान्नव धार्मिक व प्रेरणा स्थळांच्या पवित्र मातीचे पूजन राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सर्व 'युथ आयकॉन'च्या हस्ते झाले.

आमदार पवार म्हणाले, "मी स्वतः भगव्या रंगातून प्रेरणा घेतली. मतदारसंघातील लोकांसह सर्व जाती-धर्मांतील लोकांनी एकत्रित येऊन याला पाठिंबा दिला. भगवा ही संस्कृती आहे. ती जपण्याचे काम आमची पिढी करीत आहे.

हेही वाचा: सावधान! अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढतोय

''सकारात्मक बीजारोपण'' प्रार्थनेची चर्चा

राज्यातील स्रीयांवर अन्याय होऊ देणार नाही. स्वतःचे शिक्षण पूर्ण करेल व आपल्या आसपास कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेईल, कोणत्याही अंधश्रध्देला बळी न पडता, माझ्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगिकार करील. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल. आई-वडीलांचा,समाजाला उपयोगी पडणाऱ्या ज्येष्ठांचा मान ठेवीन. जाती-धर्म, शहरी-ग्रामीण असा करणार नाही; तसं होऊ देणार नाही, अशा आशायची ही प्रार्थना होती. हॅलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. विजयादशमी असल्याने सोन्याचाही (आपट्यांच्या पानांचाही) त्यात समावेश होता.ध्वजाचे पूजन करण्यासाठी कोण येणार याची अनेकांना उत्कंठता होती. पूजनासाठी समतेचा विचार घेऊन पुढे आलेल्या साधू-संत व कॉमन मॅनच्या हस्ते स्वराज्य ध्वजाची उभारणी करण्यात आली.

हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनची नासाडी; शेंगांना फुटले कोंब

loading image
go to top