esakal | अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ४१५ नवे रुग्ण | Corona Updates
sakal

बोलून बातमी शोधा

corona

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ४१५ नवे रुग्ण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : कोरोनाचे दिवसभरात ४१५ नवीन रुग्ण वाढले आहेत. बाधितांची एकूण संख्या तीन लाख ४८ हजार ७११ झाली आहे. दिवभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या पोर्टलवर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सहा हजार ९१० झाली आहे. सध्या तीन हजार २१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १२३, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १६४ आणि अँटीजेन चाचणीत १२८ रुग्ण आढळून आले. कोरोनातून बरे झालेल्या ६१४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तीन लाख ३८ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१० टक्के झाले आहे.


तालुकानिहाय नवीन रुग्ण याप्रमाणेः संगमनेर ५३, पाथर्डी १८, श्रीगोंदे ३६, पारनेर ३७, राहाता ३९, अकोले ३५, शेवगाव २४, नगर तालुका २८, नेवासे २३, कोपरगाव ११, कर्जत १३, राहुरी ४०, नगर शहर २२, श्रीरामपूर १६, जामखेड व भिंगार छावणी परिषद प्रत्येकी तीन, लष्करी रुग्णालयात एक तर बाहेरील जिल्ह्यातील १३ रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा: सख्ख्या भावंडांवर नियतीचा घाला; आई आणि बहिणीचा एकच आक्रोश

हेही वाचा: 'थोडीशीही चूक झाली असती तर…'; DIG शेखर पाटलांनी सांगितला अनुभव

loading image
go to top