esakal | राहुरी : सख्ख्या भावंडांवर नियतीचा घाला; आई आणि बहिणीचा एकच आक्रोश
sakal

बोलून बातमी शोधा

two brothers were swept away in the water in rahuri

सख्ख्या भावंडांवर नियतीचा घाला; आई आणि बहिणीचा एकच आक्रोश

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : शहरातील बारा ते पंधरा वयोगटातील पाच मुले गणपती घाट परिसरात मुळा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. पैकी दोघेजण सख्खे भाऊ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्देवी घटना आज (मंगळवारी) दुपारी एक वाजता घडली. त्यांचा उशिरापर्यंत शोध सुरू होता. तिघेजण बालंबाल बचावले. अमर चंद्रकांत पगारे (वय १५) व सुमित चंद्रकांत पगारे (वय १२, रा. लोहार गल्ली, राहुरी) अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत.

दरम्यान वाहून गेलेल्या मुलांना वडील नसल्याचे समजते. दोन्ही मुले, आई व एक बहीण असे कुटुंब होते. घटनास्थळी आई व बहिणीने एकच आक्रोश केला. धीर सुटल्याने आई बेशुद्ध झाली. तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.

हेही वाचा: कांद्याने गाठला चार हजारांचा टप्पा; शेतकऱ्यांमध्ये समाधान

शहरातील लोहार गल्लीतील अमर व सुमित यांच्यासह समीर सचिन खंडागळे, शाहीर सचिन खंडागळे, रिहान भैय्या शेख ही मुले मुळा नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले. दुपारी एक वाजता सुमित पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अमर सुद्धा वाहून जाऊ लागला. पंकज नारद, उत्तम आहेर, शहारूख सय्यद, सोन्या सय्यद, सिद्धार्थ कर्डक या तरूणांनी अमर व सुमित यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू, काही क्षणात दोघे भाऊ पाण्यात दिसेनासे झाले.

घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप, तहसिलदार फसियोद्दीन शेख, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे राजेंद्र पवार, महेंद्र ताकपिरे यांनी पथकासह धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. परंतु, शोध लागला नाही.

हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन

loading image
go to top