esakal | जामखेडला कोरोना आणला परदेशी नागरिकांनी; त्यात भर घातली मुंबई- पुण्यासह...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona virus positive patient are increasing in Jamkhed taluka

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेडकरांच्या मागील साडेसातीचा फेऱ्याने पुन्हा डोकेवर काढले आहे.  यावेळी सापडलेल्या रुग्णांची 'हिस्ट्री' केवळ जामखेडच्या पत्त्याशी मिळतीजुळती आहे. या रुग्णांचे बाधित क्षेत्र अन्य ठिकाणचेच असल्याचे त्यांच्या तात्पुरत्या राहण्याच्या क्षेत्रावरुन स्पष्ट होते.

जामखेडला कोरोना आणला परदेशी नागरिकांनी; त्यात भर घातली मुंबई- पुण्यासह...

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेडकरांच्या मागील साडेसातीचा फेऱ्याने पुन्हा डोकेवर काढले आहे.  यावेळी सापडलेल्या रुग्णांची 'हिस्ट्री' केवळ जामखेडच्या पत्त्याशी मिळतीजुळती आहे. या रुग्णांचे बाधित क्षेत्र अन्य ठिकाणचेच असल्याचे त्यांच्या तात्पुरत्या राहण्याच्या क्षेत्रावरुन स्पष्ट होते.

जामखेडला कोरोना आणला परदेशी नागरिकांनी; आणि त्यात भर घातली मुंबई- पुण्यासह राज्याच्या विविध भागात असलेल्या येथील स्थलांतरित नागरिकांनी. मंगळवारी (ता. 28) रोजी जामखेडला तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले असले तरी त्यांची ट्राव्हलिंग हिस्ट्री पाहिली असता त्यांना कोरोनाचा संसर्ग जामखेडला नाही तर अन्यत्र झाला असावा, असे दिसून येते.

यावेळी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची हिस्ट्री तालुक्यातील फक्राबाद येथील रहिवासी असलेला एक रुग्ण नगर येथे मागील १० दिवसापासून इतर आजाराच्या उपचारार्थ दाखल होता. जामखेडच्या शिऊर रस्त्यावर आढळलेला रुग्ण पनवेल येथून आलेला आहे. तर खर्डा येथील रुग्ण नगर येथे खाजगी रुग्णालयात सेवेत आहे. मात्र त्यांनी कायमस्वरूपी वास्तव्यासाठी दिलेला पत्ता खर्डा येथील आहे. त्यामुळे यावेळीही आढळलेल्या रुग्णांचे 'ससंर्ग' होण्याचे क्षेत्र अन्यत्र असल्याचा दावा तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केला आहे.
दोन दिवसापूर्वी मयत झालेली खर्डा येथील महिला रुग्णाचा अन्य आजाराच्या उपचारार्थ बार्शी (जि. सोलापूर) येथे प्रवास सुरु होता. बार्शी हे रेड झोन क्षेत्र असून येथे दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. या दरम्यानच त्या महिलेला संसर्ग झाला आणि पुढे उपचारा दरम्यान त्यांचा बार्शी येथेच म्रत्यू झाला, अशी माहिती तहसीलदार नाईकवाडे यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांचा तालुक्यातील पत्ता असल्याने कुटुंबातील व्यक्ती केल्या क्वारंटाईन
या सर्वांची कोरोनाबाधित क्षेत्राची 'हिस्ट्री' अन्यत्र आढळते. तरी देखील त्यांचा कुटुंबातील अन्य व्यक्तींचा त्यांच्या संसर्ग येऊन त्यांना संसर्गाची बाधा पोहचू नाही. याकरिता काही व्यक्तींना प्रशासनाने ताब्यात घेऊन काहींचे 'स्वँब' तपासणी करिता पाठवले आहेत. तर दक्षता म्हणून काहींना 'क्वारंटाईन' ही केले आहे. जामखेडचा पत्ता दर्शविणारे तिघेजण नव्याने सापडले असून ही संख्या चारवर पोहचली आहे.

यापूर्वी आढळलेल्या रुग्णांचे बाधित क्षेत्र ही होते अन्यत्रच!
जामखेडला सुरुवातीपासून मुंबई- पुण्यासह राज्याच्या विविध भागात रोजगार, व्यवसाय व नोकरीच्या विविध भागात तात्पूर्त्या स्वरूपात स्थालांतरित झालेल्या येथील रहिवाशांचा त्रास सोसासावा लागला आहे. हे सर्वजण सुरक्षित 'क्षेत्र' म्हणून त्यांच्या कर्तव्याच्या क्षेत्राहून जामखेड तालुक्यात आलेले आहेत आणि येताना त्यातील काहींनी कोरोनाचा 'वाणवळा' जामखेडला आणला. हे मात्र निश्चित!
जामखेडच्या नावावार आढळलेल्या कोरोनाच्या बाधित रुग्ण संख्येत मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या तसेच येथून राज्याच्या विविध भागात प्रवास झालेल्या व्यक्तींचाच समावेश झालेला आहे.
कोरोनाशी सामना करिताना जामखेड पँटर्नमध्ये अंतरभाव असलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये काही नवीन उपाययोजनांची समावेश व्हायला हवा. 

  • खबरदारीच्या उपाययोजना
  • - मुंबई- पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांनी आहे तेथेच रहावे. स्वतः ची व कुटुबाची काळजी घ्यावी.
  • - मुंबई- पुण्यासह राज्याच्या विविध भागातून ग्रामीण भागात येणाऱ्या नागरिकांची माहिती दक्षता समितीने लपवू नाही. तात्काळ प्रशासनाला कळवावे व त्यांना क्वारंटाईन करावे.
  • - होम क्वारंटाईन ,फार्महाऊस क्वारंटाईनच्या नावाखाली शोधल्या जाणाऱ्या पळवाटेला आळा घालावा.
  • - जामखेड तालुक्याला जोडणार्या जिल्हासरहद्दीवरील सर्व चेक पोस्ट 'कडक' करावेत.
  • - शहरात व मोठ्या गावात  रस्त्यावर,चौकात विनाकारण होणारी गर्दी थांबवावी.
  • - सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात अन्य आजाराच्या निमित्ताने उपचारार्थ दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन क्वारंटाईन करावे.
  • संपादन : अशोक मुरुमकर
loading image