कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते होणार गौरव

सुनिल गर्जे
Wednesday, 7 October 2020

कोवीड संसर्गच्या पार्श्वभुमीवर असामान्य काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या राज्यातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी अशा 'कोवीड योध्द्यां'चा गौरव (ता. 15) ऑक्टोबर रोजी राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. यात नेवासे तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

नेवासे (अहमदनगर) : कोवीड संसर्गच्या पार्श्वभुमीवर असामान्य काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या राज्यातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी अशा 'कोवीड योध्द्यां'चा गौरव (ता. 15) ऑक्टोबर रोजी राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. यात नेवासे तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

मुंबई येथे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते (ता. 15) ऑक्टोबर रोजी रोजी सायंकाळी पाच वाजता या कोरोना योद्ध्याचा गौरव होणार आहे. गौरविण्यात येणाऱ्या या कोरोना योद्ध्यात नेवासे तालुक्यातील घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज गुंजाळ व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संदीप यळवंडे यांचा समावेश आहे.

राज्यभरातील सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आणि कोविड 19 साथ रोगाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या डॉक्टर्स,अधिपरीचारिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कक्ष सेवक-सफाईगार,आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेवीका, परिसेविका, औषध निर्माण अधिकारी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी अशा एकूण 47 कोरोना योद्ध्याचा गौरव होणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Corona Warriors will be honored at the hands of the Governor