खळबळजनक ः नगरसेविकेच्या नातेवाईक महिलेचा कोरोनाने मृत्यू, संपर्कातील लोकांना केले क्वारंटाईन

Corona's death of a woman relative of the corporator
Corona's death of a woman relative of the corporator

नगर - नगरमध्ये अगदी सुरूवातीच्या काळात कोरोनाने डॉक्टरांना बाधले होते. ते दुबईमधील प्रवास करून आल्याने त्यांना बाधा झाली होती. नंतर तबलिगींमुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला. तिसऱ्या टप्प्यात पुणे आणि मुंबईहून आलेल्यांमुळे अनेकांना बाधा झाली. पारनेर तालुक्यात काहींचा बळीही गेला. आता एकमेकांच्या संपर्कात आलेल्यांना संसर्ग होत आहे. मध्यवस्तीतील एका नगरसेविकेच्या नातेवाईकाचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

नगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका 67 वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते. त्या रुग्णालयाने तिचा स्त्राव तपासणीसाठी खाजगी मान्यताप्राप्त लॅब कडे पाठवला होता. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत व्यक्तींची संख्या ६९ झाली अाहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता ०६ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

दरम्यान, या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेण्यात येत अाहेत. त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. सकाळीच जुना मंगळवार बाजार परिसरातील एका रिक्षावाल्याला लागण झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात आता केवळ नगर शहर आणि संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. काही रूग्णांवर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com