नगरमध्ये कोरोनाचा सुळसुळाट..आणखी दहा जण पॉझिटिव्ह

Corona's fluency in the city..and ten more positive
Corona's fluency in the city..and ten more positive
Updated on

 नगर ः  शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. काही केल्या कोरोना थांबण्याचे नावच घेत नाही. आजही दहा रुग्णांची भर पडल्याने जिल्हावासियांची झोप उडाली असून प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार नगर तीन, श्रीरामपूर पाच, पेमरेवाडी (संगमनेर), दाढ बुद्रूक (राहाता) प्रत्येकी एक बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता 510वर पोचली आहे. आज आणखी तब्बल 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 333 झाली आहे. 

नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जबाबदारीचे भान बाळगणे गरजेचे आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासन सावध भूमिका घेऊन ज्या ठिकाणी कोरोनाचे अधिकाधिक रुग्ण आढळून येत आहे. त्याठिकाणी तत्काळ हॉटस्पॉट आदेश काढून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, काही नागरिक मास्क न बांधणे, सार्वजनिक ठिकाणी सर्रास थुंकताना निदर्शनास पडत आहे, अशा नागरिकांना प्रशासनाने दंडही ठोठावला आहे. नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 162 इतकी झाली आहे. आज बाधित आढळलेले सर्व रुग्ण हे यापूर्वीच्या बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. जिल्ह्यातील 57 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले.  

आणखी 21 जण कोरोनामुक्त 
जिल्ह्यात तब्बल 21 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात नगर नऊ, संगमनेर सात, श्रीरामपूर दोन, राहाता, पारनेर, नगर तालुक्‍यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 333 झाली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com