esakal | पारनेरला मुंबईतून कोरोनाचे इनकमिंग सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Corona's incoming from Mumbai continues to Parner

आज सुपे येथील 56 वर्षीय मृत महिला ही स्थानिक महिलेला कोरोनाची लागण झाल्याने अाता तालुक्याची चिंता वाढली आहे.

पारनेरला मुंबईतून कोरोनाचे इनकमिंग सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः पारनेरमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा आगमन केले आहे. एकदम आज (ता. 25 ) दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पारनेरकरांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत पारनेरला कोरोनाचा वानवळा मुंबई येथूनच  आला होता. मात्र, आज बाधित सापडलेल्या दोघांमध्ये एक खडकवाडी येथे मुंबईहून आलेला पोलीस कर्मचारी आहे. दुसरी बाधित मृत व्यक्ती सुपे येथील महिला स्थानिक आहे. अाता तिचा नेमका कोणाशी संपर्क आल्याने ती बाधित झाली. हा आरोग्य विभागासमोर मोठा गहण प्रश्न उभा आहे.

तालुक्यात गेली काही दिवस एकही कोरोनाबाधीत व्यक्ती नसल्याने तालुका कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन चांगले सुरळीत झाले होते. तसेच इतके दिवस तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीच कोरोनाबाधित सापडल्या होत्या.

हेही वाचा - कोरोनाचे नगरमध्ये आक्रमण सुरूच

आज सुपे येथील 56 वर्षीय मृत महिला ही स्थानिक महिलेला कोरोनाची लागण झाल्याने अाता तालुक्याची चिंता वाढली आहे. शिवाय ही महिला मृत झाल्याने तिच्या संपर्कातील व्यक्ती कोण हे शोधणे कठीण काम आहे. तिला नगर येथे संशयीत म्हणून दाखल करण्यापुर्वी तिला एका खाजगी दवाखाण्यातही दाखल केले होते. त्यामुळे तिच्या संपर्कातील लोकांची संख्या वाढू शकते.  

कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली  दुसरी व्यक्ती ही ठाणे येथे पोलीस दलात सेवेत आहे. ती 16 जूनला तालुक्यात आपल्या मुळ गावी खडकवाडी येथे आली होती. तिने तपासणी करून घेतल्यानंतर त्या 40 वर्षीय पोलीसाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. तिच्यासोबतच आणखी एक मित्रही ठाणे येथून आला आहे. तिच्या संपर्कात घरातील आणखी चार व्यक्तीं आहेत. त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

बाधित महिलेची संपर्क साखळीचा शोध

सुपे येथील कोरोना बाधित मृत महिलेचा अहवाल उशिराने पॉझिटिव्ह आल्याने अाता तिच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे कठीण झाले आहे.कारण तिचा मंगळवारीच अत्यंविधीही करण्यात आला. ही महिला संशयीत होती. तसेच जिल्हा रूग्णालयाच्या अधिका-यांनी या  महिलेचा मृतदेह अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईकांच्या ताब्यात कसा सोपवला हा खरा, अाता प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा ऊघड झाला आहे.

दवाखानाच सील

सुपे बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता  सर्व बाजारपेठ तिन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत. सुपे येथील त्या महिलेच्या संपर्कातील 25 जणांना तपासणीसाठी पाठवले आहे.
सुपे येथील ज्या खाजगी दवाखान्यात त्या महिलेने उपचार करून घेतले, तो दवाखाना14 दिवसांसाठी सील करण्यात आला आहे