esakal | नगरवासियांना कोरोनाचा हिसका...आणखी सात जण पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Corona's jerk to the townspeople ... seven more positive

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा आकडा सुफरफास्ट वेगाने वाढला. शासन-प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनेची वेळोवेळी जनजागृती केली. सुरवातीला समज, तर त्यानंतर अनेकांवर कारवाई केली. मात्र, मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. 

नगरवासियांना कोरोनाचा हिसका...आणखी सात जण पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 नगर ः जिल्ह्यात कोरोनाचा परिस्थिती काहिसी आटोक्‍यात येती न येती तोच कोरोनाचा वेग भलताच वाढताना दिसतो. आज सकाळी जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी सात जणांना बाधा झाली. त्यात केडगाव तीन, संगमनेर दोन, कल्याण रोड (नगर शहर), राहाता येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्यांचा आकडा 258 वर पोचला असून जिल्हावासियांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. 

हेही वाचा ः आमदार संग्राम जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा, हैप्पीवाला बर्थ डे नडला 

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा आकडा सुफरफास्ट वेगाने वाढला. शासन-प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनेची वेळोवेळी जनजागृती केली. सुरवातीला समज, तर त्यानंतर अनेकांवर कारवाई केली. मात्र, मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. 

अवश्‍य वाचा ः नगरच्या संशोधकांचे इस्त्रोसाठीचे उड्डाण रखडले या कारणाने 

नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कल्याण रोड (नगर शहर) येथील 55 वर्षांची महिला, केडगाव येथील 29 वर्षांची व्यक्ती, 16 वर्षांची मुलगी, तर बारा वर्षांच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय खंडोबा चौक (राहाता) येथील 13 वर्षांची मुलगी, संगमनेर शहरातील 30 वर्षांची व्यक्ती तसेच मुंबईहून संगमनेर येथे आलेली 24 वर्षांच्या युवतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. 
 
loading image