नगरच्या संशोधकांचे "इस्रो'साठीचे उड्डाण रखडले या कारणाने

दौलत झावरे
Sunday, 14 June 2020

तीन वर्षांत इस्रोची सहल जिल्ह्यातील 124 विद्यार्थी व 24 अधिकारी करून आले आहेत. चौथ्या वर्षातील सहलीसाठी 42 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्याबरोबर जाणाऱ्या आठ जणांची निवड करून त्याची टेंडर प्रक्रिया राबवली होती. परंतु कोरोना संसर्ग वाढल्यामुळे ही सहल रद्द करून आगामी शैक्षणिक वर्षात जानेवारी ते मार्च 2020 या दरम्यान काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नगर : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांची "इस्रो'ची सहल नेण्यात येते. मात्र, सलग तीन वर्षे गेलेल्या सहलीला चौथ्या वर्षात "कोरोना'चा अडसर ठरल्यामुळे रद्द करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. या सहलीसाठी पुन्हा निधीची तरतूद करून सहल नेण्याचे नियोजन असले, तरी निधीची अडचण येणार असल्याने "इस्रो' वारीत निधीमुळे "खंड' पडण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

हेही वाचा ः सौ शेरी, एक संगमनेरी पण आता कोरोना ठरतोय भारी... बाधित सेंच्युरीच्या वाटेवर

जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनवृत्ती वाढीस लागावी, यासाठी वैज्ञानिक सहलीचे आयोजन केले जात आहे. यामध्ये पाचवी ते आठवीमध्ये शिकणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातून तीन विद्यार्थ्यांची निवड करून या विद्यार्थ्यांना विक्रम इस्रो येथे सहलीला नेले जात आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यानंतर मुलाखतीनंतर प्रत्येक तालुक्‍यातील तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

अवश्य वाचा ः वजन, दराची माहिती मोबाईलवर

तीन वर्षांत इस्रोची सहल जिल्ह्यातील 124 विद्यार्थी व 24 अधिकारी करून आले आहेत. चौथ्या वर्षातील सहलीसाठी 42 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्याबरोबर जाणाऱ्या आठ जणांची निवड करून त्याची टेंडर प्रक्रिया राबवली होती. परंतु कोरोना संसर्ग वाढल्यामुळे ही सहल रद्द करून आगामी शैक्षणिक वर्षात जानेवारी ते मार्च 2020 या दरम्यान काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चौथ्या वर्षातील सहल गेली नसताना पाचव्या वर्षाच्या सहलीचे नियोजन होणार का? शासनाने जिल्हा परिषदेच्या निधीत कपात केल्यामुळे सहलीवर 15 लाख खर्च केला जाईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. निधीमुळे इस्रो वारीत खंड पडण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषदेच्या सेसमधून इस्रो सहलीसाठी निधीची तरतूद केली जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहल रद्द करून ती आगामी वर्षात जानेवारी ते मार्च 2021 च्या दरम्यान नेण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतलेला आहे. 
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग 
 
इस्रो सहलीची प्रक्रिया पाचव्या वर्षातही केली जाणार असून, त्यासाठी लागणारा निधी आपण सेसमधून उपलब्ध होण्यासाठी मागणी करणार आहे. 
- प्रताप शेळके, उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "ISRO's trip will be canceled due to money