संगमनेर @206... दिवसभरात 12 रुग्णांची भर 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 July 2020

संगमनेर तालुक्‍यात कोरोनामुळे बाधीत रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्‍यातील नवीन गावांमधील रुग्णांसह तालुक्‍याच्या कोरोना आकड्याने द्विशतक पार करुन, 206 पर्यंत मजल गाठली आहे. 

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्‍यात कोरोनामुळे बाधीत रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्‍यातील नवीन गावांमधील रुग्णांसह तालुक्‍याच्या कोरोना आकड्याने द्विशतक पार करुन, 206 पर्यंत मजल गाठली आहे. 
संगमनेर खुर्दमधील संक्रमिताच्या संपर्कात आलेल्या 13 वर्षिय बालिकेच्या अहवालानंतर दुपारी शहरातील तेलीखुंट परिसरातील 57 वर्षीय तर कुरण रोड परिसरातील 75 वर्षीय पुरुष, तालुक्‍यातील करुले येथील 29 वर्षाच्या युवकाला व निमोण येथील 64 वर्षाच्या महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. या पाच जणांच्या अहवालानंतर सायंकाळी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा नव्याने सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संगमनेरचा कोरोना आलेख द्विशतक पार करुन 206 झाला आहे. 
सायंकाळी आलेल्या अहवालात तालुक्‍यातील कनोली येथून प्रथमच 64 व 32 वर्षीय पुरुष तसेच 28 व 25 वर्षीय युवतींचा समावेश आहे. तर दोनच दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या संगमनेर शहरालगतच्या राजापूर रस्त्यावरील ढोलेवाडीतून संक्रमिताच्या संपर्कात आल्याने तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात 35 वर्षीय पुरुष, अठरा वर्षाचा युवक व आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. आज एकाच दिवशी संगमनेर तालुक्‍यात तब्बल बारा रुग्णांची भर पडली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Count of corona patients in Sangamner taluka 206