esakal | ब्रेकिंग ः इंदोरीकर महाराज हाजिर हो...आता कीर्तनाची नाही तर कोर्टाची तारीख
sakal

बोलून बातमी शोधा

Court date to Indorikar Maharaj

इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात 'स्त्री संग समतिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होत असल्याचे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

ब्रेकिंग ः इंदोरीकर महाराज हाजिर हो...आता कीर्तनाची नाही तर कोर्टाची तारीख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नगर : इंदोरीकर महाराज यांना आता कीर्तनाची नाही तर कोर्टाची तारीख पडणार आहे. आपल्या बेधडक वक्तव्यामुळे प्रसिद्ध असलेले कीर्तनकार व समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी मुलगा व मुलगी यांच्या जन्म तिथीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची किंमत मोजावी लागणार आहे.
 संगमनेर न्यायालयात त्यांच्या विरोधात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरुन पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत 19 जून रोजी गुन्हा दाखल झाला.त्याची आज संगमनेर न्यायालयात सुनावणी झाली. त्यात त्यांना बाजू मांडण्यासाठी पुढच्या महिन्यातील तारीख दिली आहे.

हेही वाचा - भिंगार नाल्यात नगरकरांनी बांधले बंगले

या बाबत अधिक माहिती अशी, इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात 'स्त्री संग समतिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असे सांगत पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केल्याने रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला
असे वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केले होते. त्यांच्या कीतर्नाचा व्हिडिओ' मराठी कीर्तन व्हिडिओ 'या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून अनेक संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. याची दखल घेत यामुळे पीसीपीएनडीटी (गर्भलिंग निदान ) कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत, नगर येथील समिती सदस्यांनी त्यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. त्यावर इंदोरीकरांनी वकिलामार्फत त्यांची बाजू स्पष्ट केली होती. मात्र,या वादात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने उडी घेतल्यानेस राज्य कार्यवाह अँड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे 17 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्याची दखल न घेतल्याने 27 फेब्रुवारी 2020 रोजी कलम 28/ 1 ब नुसार काय़देशिर कारवाईची नोटीस पाठवून या प्रकरणी कारवाई न केल्यास जिल्हा शल्य चिकीत्सकांना सहआरोपी करण्याचा इशारा दिला होता.

क्लिक करा - जिल्हा बँक पीक कर्जावर व्याजच घेणार नाही

या संबंधी संर्व व्हीडीओसह पुरावे सादर केले होते. तसेच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील आपल्या वकिलामार्फत इंदोरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. 10 दिवसात माफी मागण्यास सांगितले होते. मात्र महाराजांनी केवळ खेद व्यक्त केला होता. त्या काळात महाराजांचे समर्थक व विरोधकात चांगलेच रान पेटले होते.
त्यानुसार जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या आदेशावरुन संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. भास्कर भवर यांनी संगमनेरच्या कनिष्ट स्तर वर्ग 1 न्यायालयात गर्भलिंग निदान कायद्यान्वये फिर्याद देत, गुन्हा दाखल केला आहे. त्याची २६ जूनला सुनावणी होणार होती. परंतु ती आज झाली. त्यात महाराजांना ७ अॉगस्टला हजर राहण्याचे फर्मान कोर्टाने काढले असल्याचे समजते. त्या दिवशी इंदोरीकरमहाराज कशी बाजू मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
loading image