esakal | छत्रपती महाविद्यालयात ५० खाटांचे कोविड सेंटर, अॉक्सिजन बेडही उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Center of 50 beds in Chhatrapati College

आता ग्रामीण रुग्णालयात 20 बेडचे सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम विभागाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दहा, नगरपालिकेतील भाजप व कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दहा, अशा 20 ऑक्‍सिजन बेडसाठी निधी दिला. 

छत्रपती महाविद्यालयात ५० खाटांचे कोविड सेंटर, अॉक्सिजन बेडही उपलब्ध

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे ः तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढत असता एकाही ठिकाणी सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम नव्हती. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत होत्या. यामुळे राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात 20 ऑक्‍सिजन बेड तयार केले आहेत. तालुक्‍यासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. 

शहरासह तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, "सकाळ'ने तालुक्‍यात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नसून कुठल्याही रुग्णालयात सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम नसल्याचे वृत्त दिले होते. त्याची दखल घेत तालुक्‍यातील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्याधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला आहे. 

हेही वाचा - ऊसतोडणीसाठी वृध्द सोबत न आल्यास मुलांना कोण सांभाळणार

आता ग्रामीण रुग्णालयात 20 बेडचे सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम विभागाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दहा, नगरपालिकेतील भाजप व कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दहा, अशा 20 ऑक्‍सिजन बेडसाठी निधी दिला. 

नागवडेंच्या स्मृतीनिमित्त कोविड सेंटर 
शिवाजीराव नागवडे यांच्या स्मृती दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 50 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. त्याचीही सगळी तयारी झाली असून, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे नियोजन करीत आहेत. 

शहरासह तालुक्‍यात कोरोनाविरुद्ध लढ्यात प्रमुखांचा पुढाकार वाढत असून हा सकारात्मक बदल रुग्णसेवेसाठी उपयोगी येईल. सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम तयार असून त्यासाठी लागणाऱ्या ऑक्‍सिजनची व्यवस्था झाली आहे. 
- डॉ. नितीन खामकर, तालुका आरोग्याधिकारी, श्रीगोंदे