esakal | शेवगावात घुले बंधू-ढाकणे उभारणार कोविड सेंटर

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर
शेवगावात घुले बंधू-ढाकणे उभारणार १५० बेडचे कोविड सेंटर
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

शेवगाव : तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या रुग्णांना तालुक्‍यातच उपचार मिळावेत, यासाठी माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नातून शेवगाव येथे 100 बेडचे, तर संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्‍वर सहकारी साखर कारखानाच्या बोधेगाव कार्यस्थळावर अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांच्या प्रयत्नातून 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्‍यातील गोरगरिबांची सोय होणार आहे.

तालुका प्रशासनाने शेवगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात 75, त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलात 150, ग्रामीण रुग्णालयात 50 बेडचे, तर शेवगाव शहरात सहा, तर बोधेगाव येथे एक खाजगी कोविड सेंटर सुरू आहेत.

हेही वाचा: कोरोनाने आणली वाढदिवसालाच श्रद्धांजलीची वेळ!

तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच असल्याने माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील स्व. मारुतराव घुले पा. मंगल कार्यालयाच्या इमारतीत 100 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. त्याची पाहणी माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी केली.

यावेळी ज्ञानेश्‍वरचे संचालक काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे सभापती ऍड. अनिल मडके, संचालक संजय कोळगे आदी उपस्थित होते.

बोधेगाव येथे संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर 50, तर पाथर्डी येथे कै. सुमनताई ढाकणे प्रतिष्ठानच्या वतीने एकलव्य अध्यापक विद्यालयात 100 बेडचे कोविड सेंटर अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात येत आहे.

बातमीदार - सचिन सातपुते