प्रशासनाने सुविधा दिल्यास कोविड सेंटर सुरु करतो

शांताराम काळे
Tuesday, 22 September 2020

कोविड सेंटर उभे करतो, प्रशासनाने आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी, औषधोपचार आदी सुविधा द्यावी, असे पत्र माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तहसीलदारांना दिले आहे.

अकोले (अहमदनगर) : कोविड सेंटर उभे करतो, प्रशासनाने आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी, औषधोपचार आदी सुविधा द्यावी, असे पत्र माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तहसीलदारांना दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या दोनच कोविड सेंटर सुरू आहेत. त्यापैकी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अगस्ति सह साखर कारखान्याने 100 बेड्सचे कोविड सेंटर सुरू असून खानापूर येथे एक कोविड सेंटर सुरू आहे. ते कमी पडत असून माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रयत्नांने तालुक्यात अजून एक 50 बेड्सचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी काही दाते व समाजसेवी संघटना पुढे येण्यास तयार असून ते दोन वेळचे जेवण, एकवेळ नास्ता व दोन वेळेचा चहा याची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. तरी प्रशासनाने या कोविड सेंटरसाठी आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, कंपाउंडर, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा यंत्रणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात राज्य शासन व प्रशासन कमी पडत असताना माजी आमदार पिचड हे कोरोनाच्या रुग्णांच्या सुविधेसाठी करीत असलेल्या पाठपुराव्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. आता प्रशासन व शासन या बाबत काय पाऊले उचलतात ह्या कडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid starts the center of facilitated by the administration