कोविड लसीकरणास कोपरगावमध्ये प्रारंभ

मनोज जोशी 
Tuesday, 26 January 2021

शासन नियमानुसार अत्यंत पारदर्शकपणे लसीकरणाला सुरवात केली असून, आधार लिंक असल्याने आधी संबंधितांना मोबाईलद्वारे लसीकरणाचा मेसेज दिला जातो.

कोपरगाव (अहमदनगर) : कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सोमवारी तहसीलदार योगेश चंद्रे व आयएमएचे अध्यक्ष डॉ. महेंद्र गोंधळी यांच्या हस्ते कोविड लसीकरणास प्रारंभ झाला. विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे या लस घेणाऱ्या पहिल्या मानकरी ठरल्या. तालुक्‍याला पहिल्या टप्प्यात एक हजार लस प्राप्त झाल्या असून, लवकरच दुसऱ्या टप्प्यातील डोस मिळणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. गोवर्धन हुसळे, डॉ. राजेश माळी, डॉ. अजय गर्जे, डॉ. आतिष काळे, डॉ. संदीप वैरागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. जितेंद्र रणदिवे, डॉ. विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.
 
डॉ. फुलसौंदर म्हणाले, की शासन नियमानुसार पहिल्या टप्प्यात तालुक्‍यातील वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, नंतर महसूल, पोलिस, नगरपालिका, 50 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. 18 वर्षांखालील, गरोदर महिलांना लस दिली जाणार नाही. प्रथम टप्प्यात लसीकरणाला तालुक्‍यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
शासन नियमानुसार अत्यंत पारदर्शकपणे लसीकरणाला सुरवात केली असून, आधार लिंक असल्याने आधी संबंधितांना मोबाईलद्वारे लसीकरणाचा मेसेज दिला जातो. आधार व्हेरिफिकेशन झाल्यावर लस टोचली जाते. शेवटी संबंधित व्यक्तीला डिजिटल सर्टिफिकेट दिले जाते, असे डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid vaccination has started at Kopargaon Rural Hospital