
अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जिल्हाभर सुरू असलेल्या अवैध वाळू, दारू व जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. अहिल्यानगर शहर, जामखेड, श्रीरामपूर, बेलवंडी, लोणी, संगमनेर अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ३४ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. त्यात आरोपींची धरपकड करत सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.