esakal | गैरव्यवहार केल्याप्रकरणी सेवासंस्थेच्या सचिवाविरोधात गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar

Ahmednagar : गैरव्यवहार केल्याप्रकरणी सेवासंस्थेच्या सचिवा विरोधात गुन्हा

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर : येथील विविध कार्यकारी सहकारी सेवासंस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार करुन अनियमित्ता दाखविल्याप्रकरणी सचिवाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेच्या आर्थिक बाबीचे लेखापरिक्षण केल्यानंतर तब्बल आठ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. सभासदांकडुन वसुल केलेली रक्कम व एकुण जमा रक्कम बॅंकेत न भरता स्वःच्या फायद्यासाठी वापरल्याचे प्राथमिक तपासणी अहवालात समोर आले आहे.

त्यास जबाबदार धरुन विशेष लेखापरिक्षक ज्ञानदेव नामदेव भोंगळ यांच्या फिर्यादीवरुन संस्थेचा सचिव किशोर कारभारी भालेराव (रा. राजुरी, ता. राहता) याच्या विरोधात येथील तालुका पोलिस ठाण्यात आज (बुधवारी) गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलिस निरिक्षक किरण सुरसे अधिक तपास करीत आहे. आरोपीला लवकरच अटक करुन चौकशी केल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी आणखी वाढणार असल्याची माहिती तालुका पोलीसांनी सांगितली.

loading image
go to top