23 वर्षीय युवतीला मोबाईलवरुन मेसेज व धमकी देणाऱ्या युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

आनंद गायकवाड
Tuesday, 1 December 2020

शिक्षण घेत खासगी नोकरी करणाऱ्या 23 वर्षाच्या युवतीच्या मोबाईलवरील व्हॉटसअप या समाजमाध्यमावर मेसेज पाठवणाऱ्या तसेच तिला धमकी देणाऱ्या युवकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

संगमनेर (अहमदनगर) : शिक्षण घेत खासगी नोकरी करणाऱ्या 23 वर्षाच्या युवतीच्या मोबाईलवरील व्हॉटसअप या समाजमाध्यमावर मेसेज पाठवणाऱ्या तसेच तिला धमकी देणाऱ्या युवकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत यादव नवले, रा, घुलेवाडी, ता. संगमनेर असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत युवतीच्या व्हॉटसअपवर शुक्रवार ( ता. 27 ) ते रविवार ( ता. 29 ) या कालावधीत वेळोवेळी दोन वेगळ्या क्रमांकावरुन संपर्क साधून आरोपी युवकाने तिला लज्जा उत्पन्न होईल असे मेसेज केले. यामुळे त्रस्त झालेल्या य़ुवतीने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन, विनंयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime of molestation on a youth who sends a message from a mobile