Ahmednagar News : अहमदनगर हादरले; एकाच दिवशी तीन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Three suicides case in Ahmednagar city police

Ahmednagar News : अहमदनगर हादरले; एकाच दिवशी तीन आत्महत्या

अहमदनगर : शहरात रविवारी (ता.२०) एकाच दिवशी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. यामध्ये दोन तरूणी आणि एका तरूणाचा समावेश आहे. कावेरी राहुल राजपूत (वय १७, रा. केडगाव, ता. नगर) हिने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

गौरी एकनाथ शिंदे (वय १५, रा. मिसाळ गल्ली, तेलीखुंट, अहमदनगर) हिने राहत्या घरी स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभय मनोज हरिश्चंद्रे (वय १७, रा. भिस्तबाग चौक, सावेडी) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कोतवाली आणि तोफखाना पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.