
संगमनेर: चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव (खंदारे वस्ती) येथे गुरुवारी (ता. ३१) मध्यरात्री घडली. चंद्रकला दगडू खंदारे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून, पती दगडू लक्ष्मण खंदारे याला घारगाव पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.