Crime ; ‘टू प्लस’मुळे गुन्हेगारी मायनस

पोलिस दलाचा पथदर्शी उपक्रम; नगर राज्यात तिसरे, विनयभंग, घरफोड्यांचे गुन्हे सर्वाधिक
ahmednagar news
ahmednagar news esakal
Updated on

अहमदनगर : गुन्हेगारीमध्ये नगर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ‘टू प्लस’ उपक्रम प्रभावीपणे राबविला. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसला आहे.

जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. सराईत गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करून त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात एक हजार २०९ गुंड, ५३६ हिस्ट्रीशीटर, १४२ गुन्हेगारी टोळ्या, ४ हजार २७८ दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले आरोपी अशा नोंदी अद्ययावत केल्या आहेत. गुन्हेगारांच्या विरोधात योग्य ती कारवाई करून नजर ठेवण्यात येत आहे. दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची माहिती संकलित करून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे, असे सुमारे ४ हजार २७८ आरोपी आहेत.

गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्यांचे दोषारोपपत्र, आरोपींचा शोध, पुराव्यांचे संकलन या बाबींकडे पोलिसांनी अधिक लक्ष दिले आहे. ‘टू प्लस’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात प्रलंबित ४२ हजार गुन्ह्यांचा निपटारा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले आहे. विनयभंग, घरफोड्यांच्या गुन्ह्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. खून, बलात्कार आणि खूनाचा प्रयत्न असे गुन्हे देखील सुरूच आहेत.

आठ महिन्यांतील प्रमुख गुन्हे

खून - ६४, खूनाचा प्रयत्न -१८५, बलात्कार -१५७, दरोडा -२६, जबरी चोरी -२३१, घरफोडी -५४२, चोरी -२६४५, दंगल-५४०, ठकबाजी -१६८, अपहरण- ३९२, दुखापत-१८२४, विनयभंग -५७४, अपघाती मृत्यु -५५०

काय आहे ‘टू प्लस’

दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या चार हजार २७८ गुन्हेगारांची अद्यावत माहिती संकलित करण्यात आली. या माहितीनुसार प्रत्येक गुन्हेगारावर नजर ठेवण्यात आली. त्यांच्याकडून काही संशायास्पद हालचाली दिसून आल्या तर ताब्यात घेऊन चौकशी करणे, त्याचबरोबर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात वेळेत सादर करणे.

।। इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषी व्यवस्थिती ।।

।। तयोर्न वशमागच्छेत्तौ हास्य परिपन्थिनौ ।।

प्रत्येक इंद्रियात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोन्हींच्या आहारी जाऊ नये. राग आणि व्देषाच्या आहारी गेल्यास आपले नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतात. समाजातही आपणाला प्रतिष्ठा राहत नाही. त्यामुळे राग आणि द्वेषापासून दूर राहीले पाहिजे.जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. ‘टू प्लस’मुळे काही प्रमाणात गुन्हेगारी कमी झाली आहे. पारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे मेळावे घेतले. मेळाव्यातून त्यांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com