esakal | पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात धुमाकुळ घालणारे सराईत अखेर गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

criminals arrest by ahmednagar police crime news

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात धुमाकुळ घालणारे सराईत अखेर गजाआड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक भागात दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसह हत्यार दाखवुन धुमाकुळ घालणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

शिर्डी परिसरात एका बंगल्यावर दरोडा टाकुन घरमालकाला बांधुन व महिलांना चाकुचा धाक दाखवुन सुमारे १२ लाख रुपये लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडुन पसार दरोडेखोराचा शोध सुरु होता.

पोलिसांची चाहूल लागताच काढला पळ

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु होता. परंतू आरोपी सराईत गुन्हेगार असल्यामुळे वारंवार वास्तव्याचे ठिकाणे बदलत होते. परंतू पथकातील अधिकारी व कर्मचारी आरोपीच्या सतत मागावर होते. पोलिस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोंडेगाव (ता. नेवासा) येेथे यासीनखाॅं उर्फ अनिल शिवाजी भोसले व सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले (दोघे, रा. गोंडेगाव, ता. नेवासा) हे दोघे आरोपी घरी आल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तात्काळ गोंडेगाव (ता. नेवासा) येथून आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र आरोपींना पोलिसांची चाहूल लागल्याने ते पळाले. परंतू पोलिसांनी पाठलाग करुन शिताफीने सराईत गुन्हेगार आरोपींना गजाआड केले आहे.

अनिल भोसले याच्याविरुद्ध श्रीरामपूर, शनि शिंगणापूर, नेवासा, लोणंद (सातारा), पाथर्डी पोलिस ठाण्यात तर गुलब्या भोसले याच्याविरुद्ध गेवराई (बीड), गोंदी (जालना), वाळूज, वैजापूर, (औरंगाबाद), बीड ग्रामीण, तळवाडा पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचे संकेत; महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना

पोलिसीखाक्या दाखवताच दिली कबूली

पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींची प्राथमिक चौकशी केली. प्रारंभी आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिले. परंतू पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आणखी सहा साथीदारांच्या मदतीने शिर्डी येथील घरफोडी केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यातील एक साथीदार अल्पवयीन असून इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहेत. शिर्डी येथे अशिष गोंदकर (वय २३, रा. हरिओम बंगला, सितानगर नाला रोड) यांच्या घरात सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा कटावनीने तोडून बंगल्यात प्रवेश करत गोंदकर यांचे हातपाय बांधले. घरातील महिलांना चाकूचा धाक दाखवत सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १२ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लुटला होता.

हेही वाचा: अकोले : कोंभाळणेत रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा

loading image
go to top