गौरी- गणपतीच्या सजावटीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

Crowds in the markets for the decoration of Gaur Ganpati
Crowds in the markets for the decoration of Gaur Ganpati
Updated on

कोपरगाव (अहमदनगर) : श्रावणाला हिंदू संस्कृतीत महत्व आहे. गौरी- गणपतीची धामधूम सध्या बाजारपेठेत दिसून येत असून महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींचे पालन करून खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. यावर्षी महालक्ष्मी मुखवटे व साहित्य खरेदी करताना १० टक्के दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. शहरातील शिवाजी रोड परिसरात महालक्षमी समान खरेदीला पसंती दिली जात आहे.

ग्राहकांना महालक्ष्मी व साहित्य खरेदीसाठी मुंबई, पुणे येथे जावे लागत होते. मात्र गेल्या काही वर्षापासून सर्व सामन स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध करून दिले जात आहे. तीन प्रकारामध्ये महालक्ष्मी उपलब्ध असून पेण, कोल्हापूर, वाई, येथून शाडू, फायबर व पितळी महालक्ष्मी आणल्या जात आहे. शाडूचे मुखवटे 650 ते 1800 जोडी, पितळी 2800 ते 5100 जोडी या दराने उपलब्ध आहेत. अखंड महालक्षमी सेट 14 हजाराला तर इतर साहित्य देखील मोठ्या प्रमाणवर विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महालक्ष्मी कापडी मुखवटे 900 ते 1100 पर्यंत किमंत आहे. महिलांची शाडूच्या मूर्तीला मोठी पसंती आहे. सर्व दागिने, व्हाईट मेटल दागिन्याची खरेदी अग्रक्रमाने केली जात आहे. यावर्षी दहा टक्के दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

तालुक्यातील ग्राहकांना मुंबई, पुणे येथे जावे लागत नाही. उच्च दर्जाच्या शाडूच्या महालक्ष्मी सेट कमी किमतीत उपलब्ध करून दिले आहे. गेल्या दहा वर्षापासून हा व्यवसाय करतो. मात्र यावर्षी कोरोनाचा मोठा फटका खरेदीवर जाणवत आहे.

- सागर कानडे 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com