eknath shinde, radhkrishna vikhe patil and vijayrao auti
sakal
पारनेर - पारनेर शहराचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहराच्या प्रलंबित पाणी योजनेविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी वर्षभरात ही योजना पूर्ण करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.