Balasaheb Thorat
sakal
संगमनेर: महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील विदारक राजकीय चित्र समोर येत आहे. विविध पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून झालेला गोंधळ, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय, भांडण, तंटे, मारामारी हे सगळं चिंताजनक असल्याचे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. असे राजकारण महाराष्ट्रासाठी चांगले नाही. संगमनेरची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आपल्याला जपायची असल्याचे ते म्हणाले.