The dam overflowed in Akola before the monsoon
The dam overflowed in Akola before the monsoon

मान्सूनपूर्वीच अकोल्यातील हे धरण झालंय ओव्हर फ्लो

अकोले : महाराष्ट्रात अजून दाखल व्हायचा आहे. परंतु अकोले तालुक्यात एक चमत्कार झाला आहे. मान्सून दाखल झालेला नसला तरी येथील एक धरण भरले. पूर्ण पावसाळा गेला तरी महाराष्ट्रात अशी काही धरणे आहे ती भरत नाहीत. अकोल्यात मान्सूनपूर्वीच हे धरण अोसंडून वाहायला लागले.

मंगळवारी सकाली ९ जून रोजी सकाळी साडेसहा वाजता हे पूर्ण क्षमतेने भरला असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली आहे .193 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला अंबित धरण पूर्ण क्षमतेने भरले. गेल्या तीन चार दिवसांपासून मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. 

धरण भरल्याने स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे . मुळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुळा नदीवरील पहिला अंबित लघुपाटबंधारे तलाव हा 9 जून पूर्ण क्षमतेने भरला, मुळा नदीच्या उगमस्थानापासून पाणलोट क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने जलाशय भरला आहे. 

गतवर्षी 28 जून रोजी सायंकाळी 6. 30 वाजता भरला असल्याचे सहाय्यक अभियंता यांनी सांगितले .193दशलक्ष  घनफूट क्षमतेचा अंबित लघूप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. .या अंबित धरणाच्या लाभक्षेत्रातील अंबित, शिसवद, खडकी, पैठण, पाडाळणे, धामनगावपाटपर्यंतचा परिसरयेत असल्याने सिंचनासाठी अंबित लघु प्रकल्प महत्वपूर्ण ठरला आहे. अंबित भरुन वाहू लागल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .

धरणाच्या पायथ्याजवळ पॅनल उखडले अाहेत. बांधकामातील गज दिसत होते. मात्र जलसंपदा विभागाने हे काम लघु पाटबंधारे विभागाने केले आहे. दुरुस्ती तेच करणार असल्याचे कार्यकारी अभियंता नानोर यांनी सांगितले. मात्र, अद्यापि लघु पाटबंधारे विभागाने त्याची दुरुस्ती न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com