सह्याद्रीतील सहा जिल्ह्यामध्ये आढळणारे डांगी पशुधन कमी होण्याच्या मार्गावार 

शांताराम काळे
Thursday, 15 October 2020

पश्चिम घाटातील म्हणजे उत्तर सह्याद्रीतील निवडक सहा जिल्हे व त्यातील किमान १४ तालुक्यात आढळणारा डांगी हा देशी गोवंश महत्वाचे पशुधन आहे.

अकोले (अहमदनगर) : पश्चिम घाटातील म्हणजे उत्तर सह्याद्रीतील निवडक सहा जिल्हे व त्यातील किमान १४ तालुक्यात आढळणारा डांगी हा देशी गोवंश महत्वाचे पशुधन आहे. आपल्या अंगभूत गुण वैशिष्ठ्यानी सह्याद्रीतील अतिपावसाच्या व दुर्गम परिसरात टिकाव धरणारे पशुधन म्हणून याची ख्याती सर्वदूर आहे. 

संपन्न अशा कृषी जैवविविधतेतील व पाळीव प्राण्यांच्या वैविध्यातीलएक महत्वपूर्ण वाण म्हणून डांगी गायी- बैलांकडे पहिले जाते. मागील दोन दशकात ही डांगी जनावरे नानविध कारणांनी कमी होत आहेत. म्हणून लोकपंचायत संस्था पुढाकार घेत असून संवर्धनासाठी चळवळ उभारत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा डांगीचे मुख्य केंद्र (hub) आहे. त्या परिसरात डांगी पशुधन संवर्धनाचे कामलोकपंचायत संस्थेने हाती घेतले आहे. देशी गोवंश संवर्धनाचे एकवातावरण देशात निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकपंचायत’च्या स्व:स्थळी (In-situ) डांगी संवर्धन कार्यक्रमालावेगळे महत्व आहे.

एकूणच डांगी गोवंशाला स्थानिक शेतकरी वपशुपालक समुदायात वेगळे स्थान आहे. पारंपारिक जीवनशैली, उपजीविका तसेच सांस्कृतिकदृष्ट्या डांगीला वेगळे स्थान आहेच,पण आर्थिकदृष्ट्याही डांगी जनावरे अत्यंत गरजेचे आहेत. ‘आम्हीलक्ष्मीशिवाय म्हणजे डांगी शिवाय जगूच शकत नाही’, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांगाणात लहान-थोर स्री, पुरुष, युवक अशा सर्वांच्या तोंडीऐकायला मिळेल डांगी गोवंशाच्या संवर्धंनाला संबंधित सर्व घटकांचे पाठबळमिळणे गरजेचे आहे. 

स्थानिक डांगी पालक, सरकारी विभाग,सामाजिक संस्था, संशोधन संस्था, विद्यापीठे, अभ्यासक, कार्यकर्ते, राज्यकर्ते अशा विविध स्तरावरील घटकांनी अति महत्वाच्या डांगीगोवंश संवर्धंनासाठी पुढे आले पाहिजे. भविष्यात कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरातील डांगी जतन संवर्धनाचे काम ‘डांगी गोवंशसंवर्धन व पैदासकर संघा (डांगी ब्रिडर्स असोसिएशन)’ मार्फत पुढेजाणार असल्याचे  विजय सांबरे, अभ्यासक लोकपंचायत यांनी सांगितले.

राजूर येथील ग्रामदैवत भैरोबा यात्रोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या डांगी जन्वारे व कृषी प्रदर्शनाला अकोले तालुक्यातून व राज्यभरातून  शेतकरी, देशी व डांगी बैल, गायी, संकरित व देशी बी बियाणे, शेतकीय अवजारे डिलर्स, कृषी एजन्सी, शेतकरी व महिला बचत गट, एनजीओ संस्था तसेच कृषी संदर्भातील इतर सर्व स्टोल्स असतात. सुमारे एक लाखापेक्षा अधिक डांगी जनावरे या प्रदर्शनात येतात. गतवर्षी एक लाख जनावरे या प्रदर्शनात आली होती तर यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangi livestock found in six districts of Sahyadri on the way of reduction