
तळेगाव दिघे : कासारे (ता. संगमनेर) येथे तीन चोरट्यांनी भरदिवसा घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करीत धाडसी चोरी केली. चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ५० हजार रुपये रक्कम लंपास केली. सोमवारी (ता.३०) दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.