Ahilyanagar News: खैरीत आढळला मृतदेह; तांत्रिक माहितीच्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू
Unidentified Body Discovered in Khairi: मृतदेहाची ओळख पटू न शकल्याने पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सदर घटना पुणतांबे-खैरी रस्त्यालगत घडली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून उशिरा मृतदेहाचा अंत्यविधी केला.
श्रीरामपूर : तालुक्यातील खैरी निमगाव-भैरवनाथनगर शिवारातील भैरवनाथ बनाजवळ रविवारी संध्याकाळच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत खोल खड्ड्यात झुडपांत सापडला.