esakal | प्रवरा नदीच्या पाण्यावर मृत माशांचा खच

बोलून बातमी शोधा

Dead fish on the waters of the Pravara River

प्रवरा नदीकाठी मृत हजारो मासे आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली.

प्रवरा नदीच्या पाण्यावर मृत माशांचा खच
sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर ः तालुक्‍यातील उक्कलगावसह राहुरी तालुक्‍यातील आंबी व अंमळनेर येथील प्रवरा नदीपात्रात हजारो मासे मृतावस्थेत आढळले. त्यामुळे दूषित पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

नदीकाठी मृत हजारो मासे पाण्यावर तरंगताना आढळून आले. प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जाते. शिवाय, विषारी पदार्थ नदीत सोडल्याने माशांचा मृत्यू झाला. या पाण्याला लालसर रंग आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

हेही वाचा - माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनाने निधन

प्रवरा नदीकाठी मृत हजारो मासे आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. यापूर्वीही दूषित पाण्यामुळे गळनिंब, गंगापूर (ता. राहुरी) परिसरात शेकडो मासे मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर आज पुन्हा उक्कलगावसह आंबी व अंमळनेर (ता. राहुरी) नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

नदीतील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सतीश जाधव, अशोक साळुंके, बाळासाहेब साळुंके, रोहन जाधव, बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.