
Police and local authorities at the site in Ahilyanagar after a deadly incident linked to a love marriage dispute, highlighting the rising tension in the city.
Sakal
अहिल्यानगर: आधी जीवनभर एकमेकांना साथ देण्याच्या आणा-भाका घ्यायच्या, गुलाबी सप्ने रंगवायची, प्रेमाने वेडेपिसे व्हायचे...मग दोनाचे चार हात करीत रेशमी नाते विवाहबंधनात रूपांतरित करायचे....आणि मग काही दिवसांतच त्याने तिच्याविषयी किंवा तिने तिच्याविषयी संशयाने वेडेपिसे व्हायचे...याची परिणती टोकाचा निर्णय घेत थेट खुनी हल्ल्यातच नव्हे तर हत्येत होत असल्याचे धक्कादायक प्रकार वाढत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांत असे प्रकार वाढत आहेत. जोडपी टोकाचा निर्णय घेत आहेत. यामुळे प्राणघातक हल्ला, खून असे गुन्हे वाढत आहेत.