
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख एक हजार 63 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यांपैकी 18.61 टक्के जण बाधित आढळून आले.
नगर ः जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात 178 बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74 हजार 638 झाली आहे. दोन रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने, मृतांची संख्या 1124 झाली.
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख एक हजार 63 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यांपैकी 18.61 टक्के जण बाधित आढळून आले. बाधितांपैकी मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण 1.51 टक्के आहे. कालच्या बाधितांमध्ये नगरमध्ये सर्वाधिक 53 रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल पारनेर 29, राहाता 19, संगमनेर 15, नगर तालुका 13, श्रीगोंदे 9, श्रीरामपूर 8, कोपरगाव व पाथर्डी प्रत्येकी 6, जामखेड 5, कर्जत व राहुरी प्रत्येकी 3, शेवगाव 2, नेवासे 2, तसेच अकोले येथील एका रुग्णाचा समावेश आहे. परजिल्ह्यांतील 4 रुग्ण आहेत.
हेही वाचा - कोरोना वाढला ः जिल्हा प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
दिवसभरात 150 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 72 हजार 632 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 97.31 टक्के झाले आहे.