esakal | नगर तालुक्यातही आमदार नीलेश लंके यांचाच डंका
sakal

बोलून बातमी शोधा

The decision of MLA Nilesh Lanka is also welcomed in Nagar taluka

पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा व 25 लाख रूपयांचा विकास निधी घ्या असे आवाहन केले होते.

नगर तालुक्यातही आमदार नीलेश लंके यांचाच डंका

sakal_logo
By
दत्ता इंगळे

नगर तालुका ः गावाचा एकोपा ,एकसंघ पणा हा गावाचा आत्मा आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत भावकित, गावात संघर्ष उभा राहतो, पाच वर्षे रक्ताची नाती असणारे ,मित्र असणारे ऐकमेकांचे शत्रू बनतात. निवडणुकांमधून पुढाऱ्यांचे राजकारण सुरू रहाते पण गावचे गावपण संपून जाते.त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा.गावाचे गावपण ,जिव्हाळा ,प्रेम नष्ट होऊ देऊ नका असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले.त्यानुसार खडकी ता नगर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यावर ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केले. 

पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा व 25 लाख रूपयांचा विकास निधी घ्या असे आवाहन केले होते. पारनेर तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यावर एकमत होत असतानाच नगर तालुक्‍यातील जनतेनेही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. 

हेही वाचा - तुम्ही फेसबुकवर बड्या अधिकाऱ्याचे फ्रेंडस नाहीत ना

आज सकाळी आमदार लंके यांनी नगर तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणूक असणाऱ्या गावातील लोकांची बैठक राष्ट्रवादी भवन अहमदनगर येथे आयोजित केली होती.या बैठकीला प्रवीण कोठुळे, शरद कोठूळे, पत्रकार जितेंद्र निकम, सरपंच अशोक कोठुळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, रावसाहेब कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, तंटा मुक्ती चे अध्यक्ष सुनील कोठुळे, राहुल बहिरट, आदिनाथ गायकवाड यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.

पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदार यांच्या निवडणूक वेळी कोणी कोणाचेही काम करा, आपापला पक्ष धरा पण गावातील आणि भावकितील संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करा असे कळकळीचे आवाहन केले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खडकी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय खडकी ग्रामस्थांनी घेतला.

नगर तालुक्‍यातील पारनेर मतदार संघातील खडकी ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब होत असतानाच खडकी ग्रामपंचायत 50 वर्षानंतर बिनविरोध होत आहे. 
 

loading image
go to top