फेसबुकवर तु्म्ही मोठ्या अधिकाऱ्याचे फ्रेंडस असाल तर सावधान, कारण नगरमध्ये काय घडलं पहा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 December 2020

तपासात हा आरोपी दिल्लीतील द्वारका परिसरात राहत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्याच्यावर पाळत ठेवून 20 डिसेंबर रोजी त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

नगर : फेसबूकवर महिलेच्या नावाने बनावट खाते उघडून उच्चशिक्षित व्यक्तीशी मैत्री करीत त्यास 70 लाखांचा गंडा घालणाऱ्या नायझेरियन नागरिकाला सायबर पोलिसांनी दिल्ली येथून 20 डिसेंबर रोजी अटक केली.

न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. इदूह केस्टर ऊर्फ इब्राहिम (वय 33, रा. नायजेरिया, हल्ली, रा. आयानगर, दक्षिण दिल्ली) असे त्याचे नाव आहे. 
उच्चशिक्षित व्यक्तीस आरोपीने महिलेच्या नावाने मेसेज पाठविला.

रिर्झव्ह बॅंकेत अधिकारी असल्याचा बनाव करीत, दिल्ली, वाराणसी, अरुणाचल प्रदेश येथील विविध बॅंकेच्या सहा खातेदारांची खोटी नावे घेतली. हर्बल प्रॉडक्‍ट कंपनीकडून आयुर्वेदिक कच्चा माल खरेदीच्या बहाण्याने शासकीय कार्यालयाच्या बनावट ई-मेलद्वारे खोटी कागदपत्रे पाठवून संबंधित व्यक्तीची 70 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा - मला मारून टाकतील, लवकर या म्हणताच

तपासात हा आरोपी दिल्लीतील द्वारका परिसरात राहत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्याच्यावर पाळत ठेवून 20 डिसेंबर रोजी त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

न्यायालयाने त्याला 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. पोलिस निरीक्षक अंबादास भुसारी, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलिस कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिंगबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you are a friend of a big official on Facebook, read this news