कुठेही करा गुंतवणूक, आता इतकेच मिळणार व्याज..

The decision to pay an equal interest on the annual deposit
The decision to pay an equal interest on the annual deposit
Updated on

राहुरी : कोरोनाच्या संकटात पतसंस्थांच्या कर्जदारांची संख्या घटली. परंतु, ठेवीदारांची संख्या वाढली. पतसंस्थांचे आर्थिक गणित बिघडून तोटा वाढण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे, तालुक्‍यातील पतसंस्थांनी वार्षिक ठेवीचा व्याजदरात कपात करीत तो समान 9 टक्के करण्याचे ठरविले आहे. येत्या एक जुलैपासून तालुक्‍यातील सर्व पतसंस्थांनी समान व्याजदर ठेवण्याचा निर्णय पतसंस्था चालकांच्या बैठकीत घेण्यात आला. 

राहुरी येथे प्रेरणा पतसंस्थेच्या सभागृहात जिल्हा स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पतसंस्था चालक प्रकाश पारख, श्‍यामराव निमसे, शिवाजी कपाळे, अण्णासाहेब चोथे, सूर्यकांत भुजाडी, आसाराम ढूस, हर्षद तनपुरे, भाऊसाहेब येवले, श्‍याम ओझा, संजय क्षीरसागर, डॉ. दिलीप धनवटे, राजेंद्र जाधव यांनी चर्चेत भाग घेतला. 

या निर्णयांवर शिक्कामोर्तब 

बैठकीत एक वर्षाच्या ठेवीवर नऊ टक्के, ज्येष्ठांना अर्धा टक्का जास्त व्याजदर देण्यात यावा. चार टक्के मार्जिन ठेवून कर्जाचा दर ठरवावा. दैनिक बचतठेव प्रतिनिधीला अडीच टक्के कमिशन देण्यात यावे. ठेवीवरील मासिक व्याजदर साडेआठ टक्के करावा, या निर्णयांवर शिक्कामोर्तब झाले. 

राहुरीत 115 पैकी 25 संस्था सुस्थितीत 

राहुरी तालुक्‍यात 115 पतसंस्था होत्या. पैकी 55 पतसंस्था मागील काही वर्षांत अवसायानात गेल्या. सध्या 60 संस्था कार्यरत असून, पैकी 35 संस्था कागदोपत्री, तर उर्वरित 25 पतसंस्थांचा कारभार सुस्थितीत चालू आहे. पतसंस्थांना 30 टक्के रक्कम बॅंकेत गुंतविणे बंधनकारक आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकेने व्याजदर कमी करून सहा टक्के; तर जिल्हा बॅंकेने सात टक्के केला आहे. त्यामुळे पतसंस्थांचा गुंतवणुकीतील तोटा वाढला.

पतसंस्थांचा तोटा वाढण्याची भीती

शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. कोरोनामुळे व्यापारी पेठा बंद राहिल्या. त्यामुळे कर्जदार घटले, ठेवीदार वाढले. पतसंस्थांचा तोटा वाढण्याची भीती निर्माण झाली. पतसंस्था टिकाव्यात, सुस्थितीत चालाव्यात, यासाठी संस्थाचालकांनी बैठकीत ठेवीचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला. 

पतसंस्थांचे भवितव्य उज्ज्वल 

कोरोनाच्या संकटात पतसंस्थांची विश्वासार्हता वाढली. शासकीय नियामक मंडळाच्या नियमांच्या अधिन राहून पतसंस्थांचे व्याजदर समान केले. ठेवींच्या व्याजदराची स्पर्धा संपल्याने, आर्थिक शिस्त पाळणाऱ्या पतसंस्थांचे भवितव्य उज्ज्वल राहील. 
- सुरेश वाबळे, अध्यक्ष, जिल्हा स्थैर्य निधी संघ 

समान व्याजदराचा निर्णय महत्त्वाचा 

नोटाबंदी व कोरोना संकटात पतसंस्थांनी चांगली कामगिरी बजावली. पतसंस्थांचे अस्तित्व व ठेवीदारांचा विश्वास कायम राहण्यासाठी समान व्याजदराचा निर्णय महत्त्वाचा आहे. 
- शिवाजी कपाळे, संस्थापक, साईआदर्श पतसंस्था 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com