
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता असून अशा प्रकारचे हल्ले आता सहन केले जाणार नाही. राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीवरील हल्ले रोखण्यासाठी योग्य ते पावले उचलावीत. राज्य सरकारचा गुन्हेगारांवर धाक राहिला नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप रिपाइंचे जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केला आहे.
अकोले (नगर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान असलेले राजगृह बंगल्यावर दोन अज्ञात इसमाने हल्ला करून घराची व सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड केली असल्याने रिपाइं अकोले तालुका कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला. त्यावेळी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे व पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी स्वीकारले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता असून अशा प्रकारचे हल्ले आता सहन केले जाणार नाही. राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीवरील हल्ले रोखण्यासाठी योग्य ते पावले उचलावीत. राज्य सरकारचा गुन्हेगारांवर धाक राहिला नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप रिपाइंचे जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केला आहे. सदर वास्तू ही शासनाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाइंचे राज्य सचिव विजय वाकचौरे यांनी केली आहे .
यावेळी राज्य संघटक सुरेश देठे, जिल्हासंघटक रमेश शिरकांडे, तालुकाध्यक्ष गौतम पवार, माजी तालुकाध्यक्ष शांताराम संगारे, तालुका सचिव कमलेश कसबे, शहराध्यक्ष सचिन खरात, युवा शहराध्यक्ष प्रवीण देठे, युवक तालुकाध्यक्ष किशोर शिंदे आदी उपस्थित होते.
संपादन-सुस्मिता वडतिले