स्वमालकीची जागा असतानाही मिळेना लाभार्थ्यांना घरकुल; मंत्री तनपुरे यांच्याकडे लाभार्थ्यांचे गाऱ्हाणे

गौरव साळुंके
Friday, 11 December 2020

नागरिकांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष घालण्याची मागणी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी केली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील पूर्णवादनगर परिसरातील चरासमोरील नागरी वसाहतीमधील नागरिकांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष घालण्याची मागणी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी केली आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या संदर्भात पंतप्रधान आवास घरकुल योजनेअंतर्गत पूर्णवादनगर चरासमोरील लोकवस्तीमधील अनेक कुटुंबांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट आहे. परंतू नगररचना विभागातील काही त्रुटींमुळे लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. नगरपालिकेकडून बांधकाम परवाने मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांनी सदर बाब निदर्शनास आणून दिल्याचे खोरे यांनी नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांची भेट घेऊन चर्चा केली. 

नवीन परिपत्रकानुसार 150 चौरस मीटरपर्यंत भूखंड धारकांना बांधकाम परवानगी घेण्याची गरज नसल्याचे सरकारने जाहीर केले. स्वमालकीची जागा असतानाही पालिका प्रशासनामुळे परिसरातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार खोरे यांनी राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for benefits of Prime Minister Housing Scheme