esakal | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न'साठी देवेंद्र फडणवीस घालणार पंतप्रधानांना साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for Bharat Ratna award to Lokshahir Annabhau Sathe

सामाजिक, साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असेलेले साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्याकडे भाजपचे राज्य पॅनेलिस्ट समितीचे सदस्य नितीन दिनकर यांनी निवेदन देवून केली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न'साठी देवेंद्र फडणवीस घालणार पंतप्रधानांना साकडे

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : सामाजिक, साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असेलेले साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्याकडे भाजपचे राज्य पॅनेलिस्ट समितीचे सदस्य नितीन दिनकर यांनी निवेदन देवून केली. दरम्यान लवकरच यासंदर्भातील विनंती पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

नेवासे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची मुंबई येथे भेट घेवून चर्चा करत निवेदन दिले. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे उपस्थित होते. निवेदनात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आण्णाभाऊ साठे यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी केलेल्या चळवळीमुळे आज मुंबई ही महाराष्ट्रात आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी आपण (माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस) पुढाकार घ्यावा. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिफारस करावी अशीही मागणी करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या भेटी दरम्यान नितिन दिनकर यांनी त्यांचा पुस्तक देवून सत्कार केला. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी आपण लवकरच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात विनंतीपत्र पाठवणार आहोत तसेच यासाठी पाठपुरावा करण्याचेही फडवणीस यांनी दिनकर व गोरखे यांना आश्वासन दिले. 

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येवून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री फडवणीस यांना निवेदन दिले. यांनीही आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी याबाबत पंतप्रधानांना विनती पत्र पाठविण्याचेयाश्वासण दिले.
- नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष, भाजप, नेवासे 

संपादन : अशोक मुरुमकर