esakal | रस्त्याची दुरुस्ती करा, या मागणीसाठी भिक्षा फेरी काढून आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for repair of Nagar Manmad road

कोल्हार ते कोपरगाव राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. पायवाट म्हणून ओळख निर्माण झालेल्या ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी रस्त्यावर भीक मागून भिक्षा फेरी काढली व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले.

रस्त्याची दुरुस्ती करा, या मागणीसाठी भिक्षा फेरी काढून आंदोलन

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : कोल्हार ते कोपरगाव राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. पायवाट म्हणून ओळख निर्माण झालेल्या ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी रस्त्यावर भीक मागून भिक्षा फेरी काढली व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. 

सर्व सामान्यांच्या हाडाची किंमत एक रुपया असे म्हणत, खूप पैसे खाल्ले गेले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. सदर भिक्षेचा धनादेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कोपरगाव ते कोल्हार ह्या राज्य महामार्ग खड्डेच खड्डे झाले असून त्यातून रोज अपघात होऊन अनेक जण मृत्यूला कवटाळत आहे. मात्र शासनाला त्याचे सोयरसुतक नाही.

कोल्हारकडून दुरूस्ती सुरु होते आणि पुणतांबा चौफुलीला थांबते. हा आजवरचा अनुभव आहे कोपरगाव तालुक्यातून शासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर भरला जातो मग कोपरगावरच अन्याय का असा सवाल करीत रस्ता पुर्ण दुरूस्त का झाला नाही म्हणून कधीही कोपरगावचे आजी माजी लोकप्रतिनिधीनी ओरड का केली नाही.
जनता जनार्दन सुद्धा गप्प आहे. न्यायालयाला शासन सांगते खडी डांबराने खड्डे बुजवणार, पण प्रत्यक्षात मुरूमाने खड्डे भरण्याचा प्रताप शासन करीत आहे. तालुका हद्दीत म्हणजे येवला नाका ते जंगली महाराज आश्रम दरम्यानचे मोठे जीव घेणे वाहन चालकांना त्रास दायक खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करू शासनाला जागे करू, अशी हाक देत सामाजिक कार्यकर्ते काळे यांनी लाऊडस्पीकरवर देशभक्तीचे गीत लावून शहरातून भिक्षा फेरी काढली. 

शासनाला केवळ एक रुपया भीक द्या, असे आवाहन केले. मिळालेल्या भिकेचा धनादेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दान देऊन रस्ता दुरूस्तीची भिक्षा आपण मागणार असल्याचे त्यानी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर 

loading image