esakal | अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा
sakal

बोलून बातमी शोधा

Demands of FIR against Prakash Ambedkar and Gunratan Sadavarte

मराठा आरक्षणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शिवछत्रपतींच्या गादीचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले व खासदार संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान केला.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : मराठा आरक्षणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शिवछत्रपतींच्या गादीचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले व खासदार संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान केला.

तसेच आक्षेपार्ह विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल संगमनेरातील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मराठा समाजाच्या वतीने खंडू बाबाजी सातपुते (रा. सुकेवाडी, संगमनेर) यांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तर अण्णासाहेब लक्ष्मण शेलकर (रा. राजापूर रोड, गुंजाळवाडी) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

निवेदनात म्हटले आहे, अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोसबत घेवून स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतींच्या वंशजाविरोधात अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्ये करण्यात आली आहेत. अ‍ॅड. आंबेडकर व सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांवर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य जाणीवपूर्वक केले आहे. तसेच यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न अनुत्तरित आहे. याबाबत अनेकदा आंदोलने, मोर्चे निघाले आहेत. तरी देखील अद्याप आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. सध्या हा प्रश्न चर्चेत असून, वंचितचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने केली आहेत. या प्रकरणाची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा.

यावेळी शरद थोरात, राजेंद्र देशमुख, अमोल खताळ, अमोल कवडे, अविनाश सातपुते, अण्णा शेलकर, प्रशांत वामन, अविनाश थोरात, किरण घोटेकर, विवेक बोर्‍हाडे, दिनेश फटांगरे, निर्मला गुंजाळ, नीलिमा घाडगे, राजू सातपुते, अशोक सातपुते आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी निवेदन स्वीकारले.

संपादन : अशोक मुरुमकर